पिकुळे उपसरपंचपदी निलेश गवस

164

दोडामार्ग : पिकुळे येथील ग्रामपंचायतीवर निलेश गवस यांची उपसरपंच पदी वर्णी लागली आहे. राजकीय पटलावरील वळणे ही काही वेगळी असतात,घडामोडी रातोरात बदलू शकतात. पिकुळे याठिकाणी हेच घडून आलं आहे, पूर्ण संख्याबळ हाती नसतानाही विरोधकांची नेमकी पडती बाजू कोणती हे जाणून घेत योग्य पध्दतीने मोर्चे बांधणी करून व सहकाऱ्यांच्या मदतीने शिंदे गटाच्या निलेश गुरुदास गवस यांची उपसरपंच पदी वर्णी लावण्यात यश मिळवले आहे.

सरपंच आपा गवस यांनी सहकारी विवेकानंद नाईक, तिलकांचन गवस, संदीप गवस या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पिकुळे गावात अखेर मोठं यश संपादन केले आहे. या सर्वांचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी अभिनंदन केले आहे.