कोलकाता : कोलकाता येथे ५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. या चित्रपट महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यात सलमान खान, अनिल कपूर, महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा यांसारखे अनेक सेलिब्रिटी दिसले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी देखील उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी ‘बांग्लार माटी बांग्लार जल’ हे गाणे गायलं. सलमान खानने या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून केली. सध्या या महोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. त्यात एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातल आहे ज्यात ममता बॅनर्जी सलमान खानसोबत डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडिओत ममता बॅनर्जी स्टेजवर सलमान खान आणि महेश भट्ट यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओत ममता बॅनर्जी आणि सलमान खान सोबत अनिल कपूर, सोनाक्षी आणि शत्रुघ्न सिन्हा देखील स्टेजवर दिसत आहेत.
तर सौरव गांगुली देखील शेजारी टाळ्या वाजवताना दिसत आहे. ममता बॅनर्जींचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्याला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.





