बांदा : प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थांची माणगाव पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणार संपन्न झाली. मंगळवारी बांदा ते माणगाव असा पायी प्रवास करुन बांदा ग्रामस्थांनी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज संस्थापित श्री दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतले. या पदयात्रेत युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.
सकाळी बांदा येथून मार्गस्थ झालेले ग्रामस्थ दुपारी मंदिरातील आरतीच्या वेळी माणगावात पोहोचले. दर्शन व आरतीनंतर महाप्रसाद घेऊन सर्वजण बांदा येथे परतले. पुढील पदयात्रा श्री सद्गुरु साटम महाराज समाधी मंदिर दाणोली येथे होणार असून तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी सांगितले.





