मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स चाहते आवडीने जाणून घेत आहेत. आता शाहरुखच्या ‘डंकी’ या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. धमाकेदार ट्रेलर रिलीज झाल्याने चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
शाहरुखने शेअर केला ‘डंकी’चा ट्रेलर!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ‘डंकी’ या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिलं आहे,”हा प्रवास मी लालटूहून सुरू केली होती. आता याचा शेवटही माझ्या खास मित्रांसोबत मी करणार. ‘जर्नी’चा ट्रेलर एक प्रवास दाखवणारा आहे. वेड्या मित्रांची मजेशीर गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल. विनोदासह कुटुंबासोबतच्या जुन्या आठवणी तुम्हाला आठवतील. प्रतीक्षा संपली.. #DunkiDrop4 – रिलीज. ‘डंकी’ 21 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहात होणार प्रदर्शित”.





