सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल या प्रशालेमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या सुत्य उपक्रमाला मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मळगाव उपशाखाध्यक्ष शतायु जांभळे यांनी भेट दिली. या प्रदर्शनास संबोधित करताना सुधीर राऊळ यांनी सहभागी झालेल्या सर्वांचे भरभरून कौतुक केले. आगामी पिढी अशीच घडवून पुढच्या काळात आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे आणि विज्ञान हा या पिढीचा पाया आहे, तो मजबूत करा असे सांगितले तसेच त्यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
सावंतवाडी तालुक्यातील तालुकामर्यादित ५१ वे शालेय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या माध्यमातून हे विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त शाळेत भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनात तालुकास्तरीय शिक्षक आणि विद्यार्थानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या विज्ञानातील प्रयोग सादर करून मुलांनी आणि शिक्षकांनी नागरिकांची मने जिंकली.





