सावंतवाडी : शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन चित्रकला’ स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी ऋतिका भास्कर राऊळ ही उत्कृष्ट बालचित्रकार पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर तीन गटात ही ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. गट अ – इयत्ता पहिली ले पाचवी, गट ब – इयत्ता सहावी ते दहावी, गट क इयत्ता अकरावी ते पदवी.
सुंदर, सुबक, आणि अत्यंत आकर्षक असे चित्र काढणान्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन कलाकारवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.
अ, ब आणि क गटातील एकूण ४४ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शिक्षक ध्येय प्रिंट मासिक देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेचे परीक्षक मणून देविदास शिवराम हिरे कला शिक्षण मंडळ भगूर संचलित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव, ता. चांदवड, जि. नाशिक आणि श्री. अमित भोरकडे यांनी परीक्षण केले.





