सावंतवाडीत ९ डिसेंबर रोजी लोकअदालत.!

24

सावंतवाडी : उच्च न्यायालय, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या निर्देशानुसार सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व वकील संघटनेतर्फे सावंतवाडी दिवाणी न्यायालयात ९ डिसेंबरला सकाळी दहाला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना कमी वेळात प्रभावी न्याय मिळू शकतो. पक्षकारांनी दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, पोटगी आदी प्रकरणे, तसेच महावितरण, बीएसएनएल, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायती आदींनी अधिकाधिक प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवावीत. संबंधितांनी दिवाणी न्यायालयात संपर्क साधावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी. पी. पुजारी, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. जी. कुंभार यांनी केले आहे.