बांदा : मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानकनजीक ढाब्यासमोर दुभाजकात सडलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर इसम सडलेल्या स्थितीत असल्याने चेहऱ्याचा भाग विद्रुप झाल्याने ओळख पटलेली नाही. मृतदेह विच्छेदनासाठी बांधा प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्यात आला आहे. मृतदेह मयत होऊन चार-पाच दिवस उलटल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.





