महाराष्ट्र माझाचा ‘IMPACT’..! ; आंबोली रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात..!

140

सावंतवाडी : ‘पोस्टमोर्टम आंबोली रस्त्याचं.!’ या शीर्षकाखाली ‘महाराष्ट्र माझा’ने ग्राऊंड रिपोर्ट प्रसारित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खळबळून जाग आली आहे. आंबोली रस्त्याची डागडूजी करायला प्रशासनाने आता सुरुवात केली आहे. मात्र या रस्त्याची गुणवत्ता राखली जाणार काय?, याबाबत प्रवासी वर्गातून अजूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
असे असले तरी महाराष्ट्र माझाने आवाज उठवल्यावर प्रशासनाला जागा आली आणि रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी समाधानही व्यक्त केले आहे.