प्रा. रूपेश पाटील.
सावंतवाडी : कोकणातील युवकांमध्ये मूळतः गुणवत्ता आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे ते सावंतवाडी तालुक्यातील निरवडे – कोणापाल येथील प्रशांत भाईडकर यांनी.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन प्रशांत यांनी प्रचंड मेहनत करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती होत यश संपादन केले आहे.
गेली काही वर्ष तो प्रचंड मेहनत घेत होता. मात्र यश सतत हुलकावणी देत होते. मात्र अपार कष्ट, सातत्य आणि यशासाठी जिद्दीने केलेले प्रयत्न फळास आले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलामध्ये भरती होण्यासाठी प्रशांत याने महेंद्रा अकॅडेमी येथे दाखल होत संचालक महेंद्र पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तयारी केली आणि त्याच्या मेहनतीला फळही मिळाले. प्रशांत भाईडकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई – वडील, मार्गदर्शक शिक्षक, मित्र परिवार, तसेच महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांना दिले आहे.





