सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांचा वाढदिवस 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर यादरम्यान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अर्चना फाउंडेशन आणि अर्चना घारे परब मित्र मंडळाच्या वतीने सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. सौ. अर्चना घारे परब संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सौ. अर्चना घारे परब, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष अॅड. सायली दुभाषी, विवेक गवस, नईद मेमन, मनोज वाघमोरे, संदीप परब, वैभव परब आदी उपस्थित होते.
अर्चना घारे परब यांचा वाढदिवस 1 डिसेंबरला सावंतवाडी येथील श्री देव नारायण मंदिरामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते तर प्रमुख साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या दिवशीच सातार्डा – साटेली येथील माऊली मंदिरात जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. 5 डिसेंबरला वेंगुर्ले हायस्कूल येथे करिअर गाईडन्सचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. अजय दरेकर व डॉ. दिनेश जाधव मुलांना मार्गदर्शन करतील. वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे श्रीरामवाडी श्रीराम विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
6 डिसेंबरला दोडामार्ग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
10 डिसेंबरला वेतुरे वेंगुर्ले तालुक्यामध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला असून यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे केले जाणार आहे. 11 डिसेंबरला आंबोली येथे हायस्कूलच्या मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर 12 डिसेंबर हा नामदार शरद पवार यांचा वाढदिवस असून या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नामदार शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे माजी राज्यमंत्री भोसले यांनी दिली.
7 डिसेंबरला कोनाळकट्टा हायस्कूल येथे मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 8 डिसेंबरला वेंगुले तालुक्यातील अणसूर पाल येथे मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन केले आले आहे. 9 डिसेंबरला विश्वकर्मा
योजनेच्या लाभार्थ्यांना कीट वाटपाचा कार्यक्रम दोडामार्ग आणि वेंगुर्ले येथे होणार आहे.





