मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरकरची लेक सारा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. आता शिक्षणामुळे सारा चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकरने मास्टर्स पूर्ण केलेय. सोशल मीडियावर पोस्ट करत तीने याबाबतची माहिती दिली. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलेय. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत साराने चाहत्यांना आपल्या शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे. साराची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
सारा तेंडुलकरची पोस्ट –

सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये तीने आपण मास्टर्स पूर्ण केल्याचे सांगितलं. निकालाचा दिवस… असे कॅप्शन टाकत साराने फोटो पोस्ट केलाय. सारा तेंडुलकरच्या निकालाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
साराचे शिक्षण कुठे झाले ?
सारा तेंडुलकरने लंडनमध्ये ‘कॉलेज ऑफ लंडन’येथे वैद्यकशास्त्रातून (मेडिसीन) मास्टर्स पूर्ण केलेय. नुकताच विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. सारा तेंडुलकर या कोर्समध्ये 75 टक्क्यांहून (डिस्टिंक्शन) अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झालेली आहे.. साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ येथे झालं आहे. यानंतर साराने उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला होता. 2018 मध्ये लंडनमध्येच साराने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर आता तीने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलेय.

साराची सोशल मीडियावर चर्चा –
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. शुभमन गिल याच्यासोबत त्याचे नाव जोडले जाते. सोशल मीडियावर त्यांच्या अफेअयरच्या चर्चा वारंवार चालू असतात. सारा तेंडुलकरचा डिपफेक फोटोही व्हायरल झाला होता. त्यामध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल असल्याचे भासवण्यात आले होते. त्यावर सारा तेंडुलकरने संताप केला होता. तसेच असं कृत्य करणाऱ्यांना सुनावले होते. सारा तेंडुलकर क्रिकेट सामने पाहण्यासाठी अनेकदा क्रिकेट स्टेडियममध्ये हजर असते.
सारा-शुभमनची चर्चा –
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेयरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दोघांना अनेकदा स्पॉटही करण्यात आलेय. नुकतेच जिओ वर्ल्ड येथेही दोघे स्पॉट झाले होते. दोघांमध्ये अफेयर असल्याच्या चर्चा आहे. सारा अथवा शुभमन गिल यांच्याकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.





