फळ प्रक्रिया व्यवसायिकांच्या समस्या सोडवा.! ; सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाच्या वतीने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना निवेदन.

114

संजय पिळणकर

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण १२० फळप्रक्रिया उद्योजकांची नोंद आहे.
यात अजून छोटे फळ प्रक्रिया उत्पादक करणारे सुमारे ५०० उत्पादक आहेत.या उद्योगांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे चार हजार रोजगार आहेत.फळ प्रक्रिया उत्पादक स्थानीक व उच पोषण मूल्य असलेली फळे भाजीपाला दुर्लक्षित फळावर प्रक्रिया करून उत्कृष्ट प्रकारची कोकण उत्पादने उत्पादित करीत आहे.आमचे उद्योग हे कोकणामध्ये आंबा,काजू, कोकम,जांभूळ,फणस,नारळ,करवंद इत्यादी मोसमी फळावर अवलंबून आहेत व ही फळे जानेवारी ते जून या कालावधीमध्ये होतात नंतरच्या वेळी कामगारांना काम देण्यासाठी व त्यांच्या उद्योगांमध्ये कार्यरत ठेवण्यासाठी प्रसंगी नुकसान सोसून अन्य उत्पादने करावी लागतात.येथील उद्योजकाच्या प्रामुख्याने पुढील समस्यांचे प्रश्न यावेळी मांडण्यात आले.
1)कार्पोरेट व मोठ्या उद्योजकांना FSSAIभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कायदा आहे तोच तेच कायदे सूक्ष्म उद्योजकाला लावण्यात लावला जातो हा याकरिता FSSAI कायदा उद्योजकांच्या उलाढाल प्रमाणे किंवा अतिसुक्ष्म सूक्ष्म लहान उद्योजकांना कॅटेगरी प्रमाणे वेगळा करावा
2) फळ प्रक्रिया उत्पादनावर १२% जीएसटी आणि ५% जीएसटी आहे तो कमी करून मिळावा किंवा काजूला जसा सरसकट ५% जीएसटी तसा कोकणी फळांसाठी फळ फळावर उत्पादनावर ५% जीएसटी करून मिळावा.
3) महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर कोकण उत्पादने पाठविण्यासाठी रेल्वे बुकिंगची सोय नाही त्याकरिता जिल्ह्यातून गेलेल्या कोकण रेल्वे मध्ये सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी या रेल्वे स्टेशनवर मालवाहतूक बुकिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी.
4) सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये आंबा काजू जांभूळ फणस करवंदे व वेगवेगळ्या रानभाज्या उपलब्ध आहेत परंतु त्यासाठी साठवणूक करण्यासाठी जिल्ह्यामध्ये कोल्ड स्टोरेज किंवा फ्रिज रूम उपलब्ध नसल्यामुळे ही फळे व भाजीपाला वाया जातात त्यासाठी कोल्ड स्टोरेज ची व्यवस्था प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावी त्यामुळे वर्षभर ह्या कच्च्या मालाची उपलब्धता होईल.
5) उद्योगाला लागणारे वीज खूप महाग आहे प्रत्येक युनिट १३ ते १४ रुपये या दराप्रमाणे उद्योजक भरतो. त्यासाठी सोलर वीज निर्मितीसाठी लागणारी सुविधा उद्योजकाला अनुदानित किमतीमध्ये द्यावी.व विद्यमान वीज बिलास अनुदान द्यावे.
6) जिल्ह्यामध्ये फळ प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रांची सोय करावे.
7) फळ प्रक्रिया उद्योजकाला दर सहा महिन्यांनी खाद्य उत्पादनाचे NABL व FSSAI मंजूर लॅब कडून विश्लेषण करून घ्यावे लागते त्याचा खर्च प्रत्येक उत्पादन वर्गाला रुपये ६ हजार होतो. तसेच पाणी सूक्ष्मजीव तपासणी (१०५०० या मानकाप्रमाणे) करून घ्यावे लागते व हा खर्च सुमारे ७ हजार रुपये आहे सर्वसामान्य उद्योजक सुमारे वीस उत्पादने करतो व यासाठी सहा महिन्यासाठी रुपये १ लाख २७ हजार एवढा खर्च होतो प्रत्येक उद्योजक साधारण वीस ते चाळीस उत्पादने करतात व हा खर्च सूक्ष्म उद्योगाला परवडणारा नाही.वरील प्रमाणे व्यवसायिकांच्या समस्या आपल्या परीने सोडवाव्यात व त्यातून मार्ग काढावा किंवा त्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी संघाचे अध्यक्ष श्रीधर ओगले,उपाध्यक्ष शिवराम वारंग, खजिनदार हर्षल हिंदळेकर,गुरुप्रसाद नाईक, भालचंद्र राणे,दिनेश नारकर, प्रदीप शेवडे,अभिजीत तानावडे, चिन्मय सरवटे,चिन्मय फणशीकर, पांचाळ,किरण प्रभूशिरोडकर,उदय प्रभूशिरोडकर,साई प्रसाद गवंडे, सदाशिव राणे,बाबा कानेकर,अक्षय काकटकर,माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर,सावंतवाडी भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी आदी उपस्थित होते.