सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बाबुराव सिताराम परब (वय – ७८) यांचे गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख असलेल्या बाबुराव परब यांनी वरची मळेवाड शाळा व भटवाडी शाळा या गावातील शाळेमध्ये तसेच साळगाव, नाणोस, शिरोडा – खेरवाडी आदी शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करून शेकडो आदर्श विद्यार्थी घडविले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. मळेवाड येथील रवळनाथ मेडिकलचे मालक अशोक परब तसेच सुरेश आणि शशिकांत परब यांचे ते वडील होत.
Home ब्रेकिंग न्यूज सहवेदना – मळेवाड येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बाबुराव परब यांचे निधन.! ;...





