वेणूनाथ कडू यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य अध्यक्षपदी निवड.! ; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव.

31

प्रा. रूपेश पाटील.

सावंतवाडी : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिक्षकांचे खंबीर नेतृत्व व आपल्या प्रचंड जनसंपर्काने परिचित असलेले महाराष्ट्रातील लढवय्ये शिक्षक नेते वेणूनाथ कडू यांची राज्याच्या अध्यक्षपदी स्तुत्य निवड झाली आहे. या निवडणुकीत अहमदनगर येथील सुनील पंडित, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आणि वेणूनाथ कडू यांच्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य घेऊन वेणूनाथ  कडू यांनी बाजी मारली व राज्य अध्यक्षपदी ते विराजमान झाले आहेत.

आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे नेतृत्व म्हणून श्री. कडू यांच्याकडे पाहिले जाते. प्रचंड जनसंपर्क अभ्यासू नेतृत्व आणि शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असलेली तत्परता आदी गुणांच्या जोरावर श्री. कडू यांची राज्याध्यक्षपदी निवड झाली आहे, असे मानले जाते. श्री. वेणूनाथ कडू यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचे त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.