आंबोली येथील खोल दरीत कराडचा युवक कोसळला…!

सहकारी सुखरूप, घटनास्थळी पोलीस दाखल, मदतकार्य सुरू…

आंबोली : येथील घाटात मुख्य धबधब्याच्या ठिकाणी असलेल्या दरीत कराड येथील युवक कोसळला. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या सोबत असलेल्या अन्य एका साथीदारामुळे हा प्रकार उघड झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

भाऊसो अरूण माने असे दरीत कोसळलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी दिली. तुषार पवार असे सहकाऱ्याचे नाव आहे. नेमका तो युवक कसा पडला, हे अद्याप कळू शकले नाही. मदतकार्य सुरू आहे. खाली उतरून त्या युवकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे देसाई म्हणाले.