’12वी फेल’ ऑस्करच्या शर्यतीत सामिल! ; बॉक्स ऑफिसवर जमवलाय इतक्या कोटींचा गल्ला.

42

मुंबई : विक्रांत मेस्सी स्टारर ’12वी फेल’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. विधू विनोद चोप्रा आणि विक्रांत मेस्सी अभिनीत या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातही चांगली कमाई केली.

या चित्रपटात विक्रांत मेस्सीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलली. आता या चित्रपटाने आणखी एक कमाल केली आहे. विक्रांत स्टारर 12 वी फेल हा चित्रपट 96 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी स्वतंत्र नामांकन देण्यात आले आहे. अभिनेता विक्रांतने साहित्य आज तक 2023 मध्ये चाहत्यांना ही माहिती दिली.