”महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींच्या आयुष्यात…!” ; प्राजक्ता माळीची खास पोस्ट चर्चेत.

30

मुंबई : प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताने आजवर मालिका, सिनेमा आणि वेबसिरीजमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

प्राजक्ता आज लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिने कारकीर्दीच्या सुरुवातीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतुन केली. या मालिकेला आज १० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केलीय. प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी मालिकेचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता लिहीते, “आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली.
#timeflies.
त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता. आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम.

प्राजक्ता माळी पुढे लिहीते, “आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या.)
आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत.
#आदित्य-मेघना”

माळी शेवटी लिहीते, “महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. #बाबाजी लक्ष असू द्या”

प्राजक्ताच्या या मालिकेचे आजही खुप चाहते आहेत. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करतेय. याशिवाय प्राजक्ताचा काहीच दिवसांपुर्वी तीन अडकून सीताराम हा सिनेमा रिलीज झाला.