सावंतवाडी : आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ पर्यटनाचे माहेरघर’ म्हणून प्रत्येक राजकीय पुढारी म्हणत आलेले आहेत. खरंच सांगायचं झालं तर आंबोली म्हणजे दक्षिण कोकणातील थंड हवेचे ठिकाण. हे इंग्रजांच्या काळापासून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. आज इथल्या पर्यटनाला पूरक रस्ते चांगले नसल्यामुळे फटका बसत आहे. तसेच अनेक वाहनांची तोडमोड, सातत्याने अपघात होऊन नुकसान होत आहेत. बरीच वाहने अपघातग्रस्त होऊन अनेक लोकं जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे या भागातील रस्ता संपूर्ण उकडला गेला असून खराब झालेला आहे. याचा फटका स्थानिक आंबोलीवासी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांना बसत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली सदर रस्ता झालेला आहे. हा रस्ता करत असताना जबाबदार इंजिनियर्स यावरती देखरेखीसाठी होते. आता रस्त्याची भयावह झालेली दुर्दशा लक्षात घेता या जबाबदार इंजिनियर्सवरच रस्त्याची जबाबदारी टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलेली आहे.
Home ब्रेकिंग न्यूज आंबोली रस्ता आहे की साक्षात मृत्यूचा सापळा.?, ‘या रस्त्याची नैतिक जबाबदारी कोणाची?’...





