बांदा : बांदा मराठा समाज च्या वार्षिक कार्यकारणी सभेत नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली. बांदा सोसायटी च्या अळवणी सभागृहत बांदा मराठा समाजाची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली. सदर सभा राजाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये नूतन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष विराज परब, उपाध्यक्ष परिमल सावंत, सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, खजिनदार महादेव सावंत, सदस्य स्वप्नील सावंत,लवू रेडकर,अक्षय परब,रत्नाकर आगलावे,हेमंत दाभोलकर,संतोष परब , श्यामसुंदर गवस,मिलिंद सावंत, विकी कदम,जयप्रकाश सावंत तसेच सल्लागार मंडळामध्ये माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत,माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, माजी उपाध्यक्ष आनंद गवस, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, माजी सचिव महादेव सावंत, माजी सहसचिव राजेश सावंत, दीपक सावंत, तर प्रसार माध्यम प्रमुख राकेश परब याची निवड करण्यात आली.
सभेची सुरुवात सचिव महादेव सावंत यांनी केली. यामध्ये सर्वप्रथम मराठा समाजाचे दिवंगत नेते कै.विनायक मेटे यांना उभे राहून आदरांजली देण्यात आली. नंतर सभेला सुरुवात झाली. सचिव म. गो.सावंत यांनी मागील सभेचा इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर अध्यक्ष राजाराम सावंत यांनी मागील काही वर्षांमध्ये बांदा मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेले वेगवेगळे उपक्रम सांगितले. त्यानंतर नवीन पदाधिकारी व कार्यकारणी यांची निवड करण्यात आली. नवीन अध्यक्ष विराज परब यांनी बांदा मराठा समाजाची पुढील उपक्रमाची माहिती सभेपुढे मांडली. यावेळी या सभेस सागर सावंत, समीर सावंत, भूषण सावंत, हनुमान सावंत, पापू उर्फ निलेश कदम, आनंद देसाई, स्वप्निल सावंत, विष्णू वसकर,मनोज सावंत, सौ.अरुणा सावंत, श्री.मोर्ये सावत,आदी बांदा परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येन उपस्थित होते.





