अभिमानास्पद – मिलाग्रीस प्रशालेच्या प्रिया देसाईच्या चित्राची निवड शिक्षक ध्येय साप्ताहिकासाठी..!

776

सावंतवाडी : शिक्षक ध्येय महाराष्ट्र आणि आगरकर विद्याभवन,हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा 2023 या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शिक्षक ध्येयचे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक,पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहेत.स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते.

राज्यातील विद्यार्थ्यांमधून एकूण तीन गटांमध्ये ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली गेली.त्यामध्ये गुणवंत ४४ विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिकासाठी करण्यात आली.यामध्ये मिलाग्रीस प्रशालेमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु.प्रिया प्रदीप देसाई हिच्या चित्राची निवड झाली आहे.याबाबत तिला सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व साप्ताहिक अंक देऊन सन्मानित करण्यात आले.याबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ यांनी तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.