सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी गाजवले नाशिकचे मैदान.! ; मास्टर गेम्स स्पर्धेत सुयश.!

265

सावंतवाडी : दिनांक 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान नाशिक येथे राज्यस्तरीय मास्टर गेम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गचे खेळाडू चंद्रकांत शिंदे यांनी 45+ वयोगटात योगा स्पर्धेत  गोल्ड, लांब उडीत- सिल्व्हर, 400 मी. व 1500 मी.धावणे स्पर्धेत ब्राँझ पदक प्राप्त केले.

श्रीम. माधुरी खराडे यांनी 55+ वयोगटात 5 की. मी.चालणे, हाथोडा फेक, पॉवरलिफ्टिंग या सर्व स्पर्धांमध्ये गोल्ड तसेच 10000 मी धावणे, बॅडमिंटन स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले.

श्रीम. संजना सावंत यांनी 35+ वयोगटात 800 मीटर धावणे – गोल्ड मेडल, 400मी धावणे – सिल्व्हर मेडल व 200 मी. धावणे ब्राँझ मेडल मिळविले.

तसेच स्वप्नील सावंत यांनी 35+ या गटात बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले.

वरील सर्व खेळाडूंची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना सिंधुदुर्ग मास्टर गेम असोसिएशनचे सेक्रेटरी बयाजी बुराण यांचे सहकार्य लाभले.
तसेच असोसिएशनचे अध्यक्ष अतुल रावराणे व उपाध्यक्ष अनिल हळदिवे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.