सावंतवाडीत आज तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा.! ; सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांचे संयुक्त आयोजन.

33

सावंतवाडी : बालदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे सैनिक स्कूल आंबोली, आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा २०२३ आज सोमवार दिनांक २० नोव्हेंबरला सायंकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे. यात पहिला गट लहान मुलांचा आणि दुसरा गट मोठ्या मुलांचा असणार आहे.

लहान मुलांच्या गटासाठी १ ते ३ क्रमांकाला वस्तू स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार असून मोठ्या मुलांच्या गटासाठी १ ते ३ क्रमांकाला वस्तू स्वरूपात बक्षीसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

लहान मुलांचा गट पहिली ते चौथी तर मोठ्या मुलांचा गट पाचवी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ब्रँडेड टिफिन बॉक्स, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ड्रॉईंग बुक, आणि तृतीय क्रमांकाचे स्केच पेन आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
रंगभरण चित्र तालुका पत्रकार संघातर्फे पुरविण्यात येणार आहे. मात्र चित्र रंगवण्यासाठी लागणारे रंग स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहेत. कोणतेही रंग ते वापरू शकतात तर चित्राच्या एका कोपऱ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव, वय व इयत्ता लिहीणे आवश्यक आहे.
‘एक स्पर्धक एक चित्र’ असा नियम असून स्पर्धेचे उद्घाटन सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच आंबोली सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, संचालक जॉय डॉन्टस हे असणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे हे असणार आहेत.

तरी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपली नावे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर (मोबाईल क्रमांक 9405827169) व खजिनदार रामचंद्र कुडाळकर (मोबा. क्रमांक 9763717761) यांच्याकडे रविवार 19 नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदवावीत व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे