कुडाळ नगरपंचायतचा मनमानी कारभार..?

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत अनधिकृत बांधकाम, अर्धवट काम करणारे ठेकेदार, खड्डेमय रस्ते, सर्वसामान्य नागरिकांचे
आवश्यक दाखले वेळेत न देणे यावर कधीच कारवाई करत नाही, त्याबाबत विचारणा केली असता नियमांवर बोट ठेवलं जातं, आणि जे सर्वात मोठं उत्पन्नाचं स्त्रोत नागरिकांकडून कराच्या माध्यमातून मिळते त्यांच्यावरच दडपशाही करायची हे नक्कीच चुक आहे आणि ती चुक नगरपंचायतीने त्वरीत दुरुस्त करावी अन्यथा आम्हाला जनतेच्या सन्मानासाठी आवाज आमच्या पद्धतीत उठवावा लागेल असा इशारा संध्या प्रसाद तेरसे यांनी दिला आहे..? .