करिअर कट्टा – महाविद्यालयीन स्पर्धा२०२२-२३ मध्ये देवगड महाविद्यालयाच्या प्रा.बाळकृष्ण तेऊरवाडकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ‘उत्कृष्ट तालुका समन्वयक’ म्हणून प्रथम क्रमांकाने निवड.
देवगड : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘ करिअर कट्टा ‘ या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२२-२३ आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये देवगड महाविद्यालयातील BMS विभाग प्रमुख व महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक प्रा. बाळकृष्ण तेऊरवाडकर यांनी आपल्या नियोजनबध्द उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर उत्कृष्ट तालुका समन्वयक म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रा. तेऊरवाडकर यांनी स्पर्धा परीक्षा, बँकिग परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी विषयावर शासनाने नेमून दिलेल्या वक्त्यांची व्याख्याने तसेच अन्य तज्ज्ञ मार्गदर्शकाची व्याख्याने आयोजित केली. शासन आणि देवगड महाविद्यालय यांच्या संयुक्त उपक्रमातून महाविद्याल्यातील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा, बँकिंग, उद्योजकता विकास इत्यादी क्षेत्रातील नवनवीन माहिती प्राप्त होऊन त्यांच्या करिअर निवडीसाठी त्याचा फायदा होत आहे.
प्रा. तेऊरवाडकर यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.





