कुडाळ शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी बाळा कोरगावकर व सचिन कदम…!

शिवसेना जिल्हाप्रमुख,आ. वैभव नाईक यांनी केली नियुक्ती…

कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी बाळा कोरगावकर ( रा. पावशी ) व सचिन कदम (रा. कुंदे ) यांची नेमणूक केली आहे. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन पदाला साजेसे काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.