रोहाचे माजी सभापती हेमंत कांबळे आपल्या भूमिकेवर ठाम.! ; रायगड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांना देणार घरचा आहेर.? खासदार सुनील तटकरे करतील हेमंत कांबळे यांची नाराजी दूर.? आता लक्ष तटकरे यांच्या भूमिकेकडे.

368

रोहा : रुपेश रटाटे

रोहा तालुका माजी सभापती हेमंत कांबळे यांनी आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पत्रकारांना सांगितले. परखड नेतृत्व, शांत ,संयमी , तळागाळात काम करण्याची जिद्द ही ओळख हेमंत कांबळे यांची आजवरच्या राजकारणात राहिली आहे.
रायगड जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष मधुकर पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू , आणि घरातीलच सदस्य म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हेमंत कांबळे राष्ट्रवादी पक्षाला लवकरच डच्चू देणार, असे वृत्त रोहा तालुक्यातील सर्वच गावागावांत पोहोचल्याने मधुकर पाटील यांना येणाऱ्या काळात मोठा धक्का बसणार, असे सर्वत्र म्हटले जात आहे.

दरम्यान, पत्रकारांनी संपर्क साधला असता, राष्ट्रवादी रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली.
श्री. पाटील यांनी व्यक्त होत, आपलं परखड मत मांडत , माजी सभापती हेमंत कांबळे हे आमच्या घरातील आहेत. आम्ही एकत्रित बसून यावर मार्ग काढू. काही नाराजी असेल तर आम्ही ती दूर करण्याचे प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया या वेळी देण्यात आली .
मात्र हेमंत कांबळे अजूनही घेलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्षांना माजी सभापती महोदय किती जुमाणतात, हे देखील पाहावे लागणार आहे.
श्री. कांबळे यांनी मांडलेले मत त्यांचे नसून एका पत्रकाराने मांडले आहे, असा आरोप देखील जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केला होता. परंतु यावर बोलत असताना, हेमंत कांबळे यांनी या आरोपाचे खंडन करीत, मी माझ्या मताशी ठाम असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षासाठी महत्वाची समजली जाणारी वरसे ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी पक्षाची खरी ताकद समजली जाते .परंतु कांबळे यांच्या भूमिकेमुळे एकहाती सत्ता असलेल्या वरसे ग्रामपंचायतीमध्ये मोठं भगदाड पडणार का.?
ह्याच गावातून रायगड जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष मधुकर पाटील जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे माजी सभापती एकाएकी नाराज का..?, असा सवाल उपस्थितीत होतोय.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरसे गण महत्वाचा भाग राहिला आहे.
अशातच माजी सभापती नक्की कोणावर नाराज आहेत..? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल,असा धमकी वजा इशाराच देण्यात आला आहे.

रोहा तालुक्यातील पायाभूत सुविधासाठी रोहेकर आतुरतेने वाट पहात आहेत, हॉस्पिटल , पाणी टंचाई , स्थानिकांना रोजगार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. मात्र ठेकेदारी करत सर्वच मलिदा आपल्याच घशात घालण्याचे काम सध्या जोरदार चालू असल्यामुळे यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यात येते.
नेमके कोणते युवा नेतृत्व मलिदा खाण्यात व्यस्त आहेत.? हे देखील येणाऱ्या काळात स्पष्ट होईल तसं उघडपणे बोलले जात आहे.

या सर्व गोष्टीचा रोख नेमका कोणावर आहे .?, नेमके कोणते युवा नेतृत्व या मोहिमेत आघाडीवर आहेत.?
यातून ज्येष्ठ नेते काही बोध घेणार का.? की सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत राहणार.? येणाऱ्या काळात या सर्व घडामोडींवर खासदार सुनील तटकरे कशशा पद्धतीने लक्ष केंद्रित करणार.? हे देखील पाहावे लागणार आहे. तर माजी सभापती हेमंत कांबळे घेतलेल्या भूमिकेवर कितपत ठाम राहणार.? हे देखील काही दिवसात स्पष्ट होईल.