- सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड-कोंडूरेकडून आयोजित नरकासुर स्पर्धेचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावातील हौशी मंडळाकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी मळेवाड जकातनाका चौकात नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा शुभारंभ ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या स्पर्धेत एकूण गावातील सहा मंडळांनी सहभाग घेतला होता. तसेच रेडी गावतळे वाडी येथील मोरया ग्रुप व आरोस दांडेली बाजार येथील जय हनुमान मित्र मंडळ या दोन मंडळाचे नरकासुर प्रदर्शनीय म्हणून सहभागी झाले होते. ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेकडून आयोजित गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेमध्ये ‘मिक्स बॉईज सावळवाडी’ यांनी प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक ‘काशी कल्याण ब्राह्मणदेव कुंभारवाडी’ मंडळाने तर तृतीय क्रमांक श्री मुसळेश्वर मंडळ हेदुलवाडी व रॉकस्टार मंडळ नाईकवाडी यांना विभागून देण्यात आला.
- त्याचबरोबर नाईकवाडी येथील लिटल बॉयमंडळ व श्री ब्राह्मण देव कोंडुरे मंडळाला सहभागाबद्दल सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेच्या वेळी शालेय मुलांसाठी घेण्यात आलेल्या आकाश कंदील स्पर्धेचं तसेच ग्रामपंचायत कडून आयोजित आकाश कंदील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे,माजी सरपंच लाडोबा केरकर,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,सखाराम जाधव,कविता शेगडे,सानिका शेवडे, अर्जुन मुळीक,परशुराम मुळीक, तसेच परीक्षक अनिकेत आसोलकर, दीपेश शिंदे,गौरव सावंत उपस्थित होते.आकाश कंदील स्पर्धा व नरकासुर स्पर्धा पाहण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात रसिकांनी गर्दी केली होती.रसिक प्रेक्षकांच्या गर्दीमुळे मळेवाड जकातनाका चौक हा फुलून गेला होता.





