सावंतवाडी : येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे आज सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी स्वर निनाद प्रस्तुत ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा अप्रतिम संगीतमय नजराना सांजपाडवा निमित्त आयोजित केला आहे.
सावंतवाडी येथील दीपकभाई केसरकर मित्र मंडळाच्या वतीने सांजपाडवाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील नागरिकांनी व संगीतप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक दीपकभाई केसरकर मित्र मंडळ यांनी केले आहे.





