पर्यटकांसाठी विजयदुर्ग किल्ल्यात खुर्च्यांची आसन व्यवस्था.! ; विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचा पुढाकार.

110

देवगड : दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने विजयदुर्ग किल्ला पहायला येणाऱ्या शिमप्रेमी पर्यटकांसाठी, किल्ला फिरून आल्यावर क्षणभर विश्रांतीसाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था विजयदुर्ग किल्ल्यात करण्यात आली आहे, त्याचा उपयोग खासकरून वृध्द नागरिकांना होणार आहे.

सदर सेवेचा विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी खुर्च्यांवर थोडा वेळ बसत विश्रांती घेतली तसेच विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या ह्या उपयोगी व गरजच असलेल्या उपक्रमाची स्तुती करत आनंद व्यक्त केला.
विजयदुर्ग किल्ल्याचे कर्मचारी यशपाल जैतापकर आणि त्यांच्या टिमने खुर्च्यां सकाळी पर्यटकांसाठी बसण्यासाठी ठेवणे व संध्याकाळी परत आपल्या ताब्यात घेण्याची जबाबदारी घेतली आहे.


सदर कार्यक्रमाला विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे
कार्याध्यक्ष राजाराम सकपाळ, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, सचिव योगिता परूळेकर, मार्गदर्शक विश्वनाथ गडकर, जयवंत डोंगरे,
कु. ऋषिकेश जावकर तसेच गुरुकृपा क्लीनिकचे डॉ. श्री संग्राम निकम उपस्थित होते.