सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे आयोजित आकाश कंदील स्पर्धेचा युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा व नरकासुर स्पर्धेचे आयोजन मळेवाड जकातनाका येथील चौकात करण्यात आले होते.आकाश कंदील चा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना योगेश प्रभू यांनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेले दोन्ही स्पर्धां बद्दलचे ग्रामपंचायतचे कौतुक केले.तसेच उपसरपंच हेमंत मराठे व त्यांची सर्व टीम अतिशय चांगलं काम करत असून गावाच्या विकासासाठी व निधी उपलब्ध होण्यासाठी मराठे हे नेहमीच प्रयत्नशील असतात असे सांगत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव यांनी गावाचा विकास झपाट्याने होत असून आम्ही सर्वजण विकासासाठी कटिबद्ध आहोत.यासाठी ग्रामस्थांचंही सहकार्य चांगल्या प्रकारे लाभत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच सीआरपी तेजश्री पेडणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना ग्रामपंचायतीकडून शालेय मुलांच्या कलेला वाव मिळावा याकरिता आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल ग्रामपंचायतचे कौतुक केले.तसेच अशा स्पर्धा होणे गरजेचे असून पुढील वर्षी याहीवर्षी पेक्षा जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन केले.युवराज लखमराजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अतिशय चांगले काम करत असून त्याला आपले नेहमीच सहकार्य लाभेल असे आश्वासन दिले.आकाश कंदील स्पर्धा ही शालेय मुलांसाठी व खुल्या गटासाठी अशा दोन गटात घेण्यात आली असून शालेय मुलांनी आपल्या कलेच्या माध्यमातून तयार केलेले आकाश कंदील खरोखरच कौतुकास्पद आहेत असे मत व्यक्त केले.तसेच उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वच सदस्य एकजूटने काम करत आहोत.ग्रामपंचायत कडून आयोजित केलेल्या आकाशकंदील स्पर्धेला स्पर्धकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.सरपंच मिलन पार्सेकर यांनी आकाश कंदील स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रास्ताविक करत असताना गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करत असूनया तीन वर्षाच्या कालावधीत गावासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून पुढील दोन वर्षात आणखीन कोट्यावधी रुपयाचा निधी या गावाच्या विकासासाठी आणण्याचा मानस असल्याचे विशद केले.तसेच शालेय मुलांसाठी पहिल्यांदाच आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केले असून शालेय मुलांच्या हस्त केलेला वाव मिळावा हा एकच हेतू असल्याचे मराठे यांनी सांगितले.या स्पर्धेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांचे मराठे यांनी कौतुक करत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.मळेवाड जकात नाका येथील रिक्षा चालक-मालक संघटनेला संघटनेची स्थापना करून 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद नाईक यांचा लखमराजे भोसले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक,अमोल नाईक, कविता शेगडे,सानिका शेवडे,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पार्सेकर,वसंत राणे गुरुजी,राधाकृष्ण दूध सोसायटीचे संचालक सतीश सातार्डेकर, अंगणवाडी सेविका पूर्वा नाईक,मानसी सातार्डेकर,संगीता नाईक,प्रियंका पार्सेकर,सीआर पी तेजश्री पेडणेकर,श्वेता रेडकर,सरिता मसुरकर,आशा कर्मचारी सेजल कुंभार,अर्पिता मुळीक,अनुष्का नाईक,मदतीस अनुष्का नाईक, मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर,शिक्षक कळसुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे आयोजित आकाश कंदील स्पर्धेचा युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते...





