पहिली पणती आपल्या महाराजांसाठी.! ; दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचा स्तुत्य उपक्रम.

57

सावंतवाडी : प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीच्याही दिवाळीमध्ये आपल्या जिल्ह्यातील दुर्लक्षित झालेल्या महाराजांच्या स्मारकांची स्वच्छता करून स्मारकांसमोर एकतरी पणती लावून दीपावली साजरी करूया, असं आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे.

गेली चार वर्षे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या महाराजांच्या स्मारकांसमोर पणत्या लावून दीपावली साजरी केली होती. तसेच इतर जिल्ह्यातील शिवभक्तांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावर्षी आपणही आपल्या गावातील महाराजांच्या स्मारकांची स्वच्छता करून किमान एक पणती लावून आमच्या या उपक्रमात सहभागी व्हावे,अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे. ज्यांच्या जवळ महाराजांचे स्मारक नसेल अशा शिवभक्तांनी आपल्या घरातच महाराजांच्या मूर्ती किंवा फोटो समोर पणती ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे.

आपण कोणत्या गावातील महाराजांच्या स्मारकासमोर पणती लावणार आहात याबाबत खालील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ज्या गावातील महाराजांच्या स्मरकांसमोर आपण दीपावली साजरी करणार आहात त्या *गावाचे नाव, आपले नाव, आपला भ्रमणध्वनी क्रमांक* ही माहिती पाठवावी. तसेच प्रत्यक्ष दीपावली साजरी करत असतानाची छायाचित्रे अथवा आम्हाला पाठवावीत. उपक्रमात सहभागी संस्था व व्यक्तींना दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

तरी, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाराजांच्या स्मारकांसमोर पणती लावून दीपावली साजरी करूया. आपण आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क :
📱९८६०२५२८२५
📱९४२२२६३८०२
📱९४०४५९८१४७

हा संदेश आपण समाविष्ट असलेल्या पुढील समूहात पाठवायला विसरू नका.🙏🏻