सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून नरकासुर व आकाश कंदील स्पर्धेचे उद्या दिनांक 11 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मळेवाड जकातनाका येथे सायंकाळी 7 वाजता शालेय मुलांकरिता आकाश कंदील स्पर्धा, तसेच मळेवाड कोंडुरे गाव मर्यादित आकाश कंदील स्पर्धा व नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आकाश कंदील स्पर्धेचा शुभारंभ भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांच्या हस्ते तर नरकरासूर स्पर्धेचा शुभारंभ भाजप जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तसेच रात्री ठीक आठ वाजता चपई नृत्य सादरीकरण होणार आहे.या
तरी स्पर्धेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे.





