वेंगुर्लेत भाजपाची विजयी घोडदौड सुरूच.! ; आरवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे समीर कांबळी यांची बिनविरोध निवड.

80

वेंगुर्ले : तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपाचे समीर कांबळी यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , माजी सभापती प्रीतेश राऊळ , जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडीस , आय.टी.सेलचे केशव नवाथे , माजी सरपंच तातोबा कुडव , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर , उपसरपंच राहुल गावडे , अमित गावडे , शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक , ग्रामपंचायत सदस्या रीमा मेस्त्री व सायली कुडव , शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर , बाळु फटनाईक , महादेव शेगले गुरुजी , मयुर आरोलकर , आबा टाककर आदि उपस्थित होते.