रत्नागिरी येथे व्हेल माशाच्या उलटी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चारही संशयितांची जामिनावर मुक्तता.!

80

देवगड :व्हेल माशाची उलटी विक्री करणाच्या उद्देशाने जवळ बाळवल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार संशयीतांना रत्नागिरी न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयाच्या सशक्त जामीनावर मुक्त केले आहे. संशयितातर्फे ॲडव्होकेट शामसुंदर जोशी व ॲडव्होकेट सोहेल शेख यांनी काम पाहिले. रत्नागिरी शहरांनाजीकच्या चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या चार जणांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही कारवाई सोमवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ७.५५ केली होती. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम आणि व्हेल माशाची उलटी असा एकूण १८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी विकास अनंत मेस्त्री वय ४८( राहणार जामसंडे तरवाडी) , समीर विठ्ठल तेली वय ३९(राहणार बगाडवाडी मालवण) राजेश मोतीराम जगताप वय ३४ (राहणार साईनाथवाडी देवगड) महेश मनोहर ठुकरुल वय ४८ (राहणार सध्या बोरवली मुंबई, मूळ जामसंडे) या चारही संशयीतांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४८,४९ (ब)५७,५१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यांना रत्नागिरी न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.गुरुवारी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने चारही संशयितांना प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या सशक्त जामीनावर मुक्तता केली आहे.