प्रसुतीच्या कळांनी ‘ती’ विव्हळत होती…एकही रुग्णवाहिका तिच्या मदतीला नव्हती…

दोडामार्ग : दोडामार्ग मधील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोडामार्ग मध्ये गरोदर मातेला कळा सुरू झाल्या मात्र दोडामार्ग मध्ये एकूण पाच रुग्णवाहिका असून सुद्धा पुढील उपचारासाठी गोव्यात नेण्यासाठी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. गरोदर मातेला असह्य वेदना होत असल्यामुळे ती अक्षरशः रडत होती. आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा एखाद्या मातेचा जीव घेऊ शकतो हे मात्र निश्चित होत आहे. रुग्णवाहिका नसल्यामुळे तिला तात्काळ खाजगी गाडीतुन गोव्यात नेण्याची व्यवस्था करण्यात आली.