बांदा : गोवा ते औरंगाबाद अशी पुठ्ठ्याच्या रोलची वाहतूक करताना एम. एच. 20 इ. एल. 8324 ट्रक माजगाव – गरड येथे रात्री दीड वाजता आला असता, समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना गटारात गेला. या अपघातात कुणीही जखमी झाले नाहीत. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.






