सावंतवाडी मुख्याधिकारी यांनी अखेर दिव्यांग निधी केला रिलीज.! ; बबन साळगावकरांच्या मागणीला यशप्राप्ती.

61

सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी अखेर दिव्यांग निधी रिलीज केला. यामुळे दहा लाख 74 हजार रुपये सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग 111 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. प्रत्येकी दिव्यांग टक्केवारीनुसार सहा हजार रुपये एक टप्पा, दहा हजार रुपये दुसरा टप्पा, तर तिसरा टप्पा 18,000/ रुपये अशा स्वरूपामध्ये दिव्यांगाच्या खात्यामध्ये सगळे पैसे जमा होणार आहेत. हे पैसे मिळावेत म्हणून सागर साळुंखे यांच्याकडे पाठपुरवठा करून दिवाळीच्या अगोदरच सदर पैसे रिलीज करा, अशी मागणी आपण केली होती. या मागणीचा सन्मान करून मुख्याधिकाऱ्यांनी यांनी लक्ष देऊन सदर पैसे रिलीज केले त्याबद्दल मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे आभार आम्ही मानत आहोत, असे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कळविले आहे.