Home आंतरराष्ट्रीय रेकॉर्डचा जबरदस्त धडाका! ; जडेजाने १२ वर्षानंतर वाढवली फिरकीची शान, भारताचं २०...

रेकॉर्डचा जबरदस्त धडाका! ; जडेजाने १२ वर्षानंतर वाढवली फिरकीची शान, भारताचं २० वर्षानंतर अष्टक पूर्ण.

72

कोलकाता : भारताने कोलकात्यात दक्षिण अफ्रिकेवर तब्बल 243 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमधील अव्वल स्थानासाठीचे द्वंद्व जिंकले आहे. भारताच्या 327 धावांच्या प्रत्यत्तरात दक्षिण अफ्रिकेचा संघ 83 धावाच करता आल्या. विराटच्या शतकानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने गोलंदाजीत धमाका केला. त्याने 9 षटकात 33 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

याचबरोबर जवळपास 12 वर्षानंतर भारताच्या फिरकीपटूने वर्ल्डकपमध्ये 5 विकेट्स घेण्याची किमया केली. यापूर्वी युवराज सिंगने वर्ल्डकप सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. तो भारताकडून वर्ल्डकपमध्ये 5 विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू होता. आता त्याच्या जोडीला रवींद्र जडेजा देखील आला आहे.

भारताने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला आठवा विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये तब्बल 20 वर्षानंतर भारताने सलग 8 वा विजय मिळवला. या विजयाबरोबरच अनेक विक्रम देखील या सामन्यात झाले आहेत.

भारतीय फिरकीपटूची वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी

  • युवराज सिंग – 2011 वर्ल्डकप बंगळुरू, 31 धावात पाच बळी
  • रवींद्र जडेजा – 2023 वर्ल्डकप कोलकाता, 33 धावात 5 बळी
  • युवराज सिंग – 2003 वर्ल्डकप, 6 धावात 4 बळी
  • रविचंद्रन अश्विन – 2015 वर्ल्डकप, पर्थ 25 धावात 4 बळी

दक्षिण अफ्रिकेच्या डावातील एकूण धावांपेक्षा जास्त धावा करणारे प्रतिस्पर्धी फलंदाज

  • कुमार संगकारा 169 धावा – 2013 कोलंबो, अफ्रिका 140 धावात गारद
  • विराट कोहली 101 धावा – 2023 कोलकाता, अफ्रिका 83 धावात गारद.

धावांच्या बाबतीत दक्षिण अफ्रिकेचा सर्वात मोठा पराभव

  • 2023 – कोलकाता, भारताविरूद्ध 243 धावांनी पराभव
  • 2002 – पोर्ट एलिझाबेथ, पाकिस्तानविरूद्ध 182 धावांनी पराभव
  • 2013 – कोलंबो, श्रीलंकेविरूद्ध 180 धावांनी पराभव
  • 2018 – कोलंबो, श्रीलंकेविरूद्ध 178 धावांनी पराभव.

    दक्षिण अफ्रिकेची वनडेमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्या

    • 1993 – ऑस्ट्रेलियाविरूद्ध 69 धावा
    • 2008 – इंग्लंडविरूद्ध 83 धावा
    • 2022 – इंग्लंडविरूद्ध 83 धावा
    • 2023 – भारताविरूद्ध 83 धावा
    • 2022 – भारताविरूद्ध 99 धावा

    दक्षिण अफ्रिकेची वर्ल्डकपमधील यापूर्वीची सर्वात कमी धावसंख्या ही 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध (149 धावा) होती.

    पूर्ण सदस्य असलेल्या संघाचा वर्ल्डकपमधील धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा पराभव

    • 2023 – मुंबई, श्रीलंका विरूद्ध भारत
    • 2015 – सिडनी, वेस्ट इंडीज विरूद्ध दक्षिण अफ्रिका
    • 2023 – कोलकाता, दक्षिण अफ्रिका विरूद्ध भारत
    • 2023 – मुंबई, इंग्लंड विरूद्ध दक्षिण अफ्रिका
    • 2007 – सेंट जॉर्ज, न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया.
    • आजच्या सामन्यात 2023 मध्ये पहिल्यांदाच (वनडे) दक्षिण अफ्रिकेला एकही षटकार मारता आलेला नाही.