बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे सदानंद कुणकेरकर सेवानिवृत्त.! ; अनेकांनी दिल्या शुभेच्छा.

117

सावंतवाडी : आपल्या तब्बल 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र सावंतवाडी शाखेचे कर्मचारी सदानंद कुणकेरकर सन्मानाने सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सावंतवाडी शाखेतर्फे बँकेचे मॅनेजर श्री. मनीष कुमार झा यांनी त्यांना सेवानिवृत्तीवर शुभेच्छा देत निरोप दिला. यावेळी डेप्युटी मॅनेजर अजय कुमार यांनी त्यांच्या प्रामाणिक आणि सेवातत्पर कार्याचा सन्मान करून आपल्या मनोगतातून त्यांचा गौरव केला.
यावेळी बँकेचे अधिकारी श्री. हरी, गौरव होडावडेकर, संदेश सावंत, श्रीधर नातू, सौ. नीता गोवेकर, सुनील दळवी, मुकुंद वझे यांनी त्यांच्या सेवेचा येथोचित सन्मान करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. 

या निरोप समारंभ प्रसंगी बाळ सातावळेकर, सेवानिवृत्त बँक कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते पॉली परेरा , रमाकांत कुलकर्णी रघुनाथ उर्फ मींट्या सावंत, तसेच सेवापूर्ती समारंभाचे मुख्य सेवाव्रत्ती सदानंद कुणकेरकर आणि त्यांचे कुटुंबीय हजर होते. यावेळी सदानंद कुणकेरकर व सौभाग्यवती कुणकेरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव होडावडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण वाडकर यांनी केले.