सावंतवाडी : आरोंदा पोलीस दूरक्षेत्र येथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केल्यास आरोंदा पंचक्रोशीतील ग्रामस्थ पोलीस निरीक्षक सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषण छेडणार, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.
आरोंदा पोलीस दूरक्षेत्र येथे आरोंदा बीट हवालदार विनय केरकर व भगीरथ मोळे हे कार्यरत असून वैयक्तिक पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर झालेले मतभेदाच्या कारणावरून त्यांची बदली व्हावी, असा तक्रार अर्ज अशोक नाईकसह काही ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलिसांकडे केला असून बदली न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आरोंदा पंचक्रोशी ग्रामस्थांनी एकवटत पोलीस निरीक्षक सावंतवाडी यांना निवेदन देत केरकर व मोळे यांची बदली करू नये, अशी मागणी केली आहे. केरकर यांची बदली करावी या तक्रारीवरून इतर ग्रामस्थ एकवटले असून केरकर यांची वैयक्तिक तक्रारी अर्जावरून बदली न करता आरोंदा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे. वैयक्तिक तक्रारी अर्जावरून केरकर यांची बदली केल्यास तीनशेहून अधिक ग्रामस्थ पोलीस निरीक्षक सावंतवाडी कार्यलयसमोर उपोषण छेडतील, असा इशारा आरोंदा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी निवेदनातून पोलीस निरीक्षक, सावंतवाडी यांना दिला असून माहितीसाठी सावंतवाडी तहसीलदार यांना प्रत दिली आहे. ग्रामस्थांनी उपोषणाचा दिलेल्या इशारावर पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home ब्रेकिंग न्यूज ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केल्यास सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडणार.!...





