लखनऊ : फक्त 230 धावांचे आव्हान असूनही टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा धुव्वा उडवला. जसप्रित बुमराहने सलग दोन चेंडूवर इंग्लंडला हादरे दिल्यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नाही. मोहम्मद शमीने सलग दुसऱ्या सामन्यात घातक मारा करत चार विकेट घेतल्या आणि इंग्रजांचा बाजार उठवण्यात मोलाची भूमिका बजावली. या दोघांच्या भेदक गोलंदाजीला कुलदीप आणि रविंद्र जडेजाची सुद्धा दमदार साथ मिळाली. शमीने चारपैकी तीन क्लीनबोल्ड विकेट घेत इंग्लंडची दाणादाण उडवली. बुमराहने तीन विकेट घेतल्या.
Home आंतरराष्ट्रीय शमी अन् बुमराहच्या वादळात इंग्रजांचा बाजार उठला, विश्वविजेत्यांना स्पर्धेतून बाहेर फेकले! ;...




