सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या सुकन्या, शहरातील मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी आस्था लोंढे यांनी सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेत सर्वप्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच शास्त्रीय नृत्य कथक या परीक्षेत प्राविण्य मिळवल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक डॉ. जी. ए. बुवा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सहसचिव राजू तावडे, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, जिल्हा खजिनदार भरत गावडे यांसह कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुका पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,
दरम्यान आस्था लोंढे यांच्या भविष्यमय वाटचालीसाठी त्यांना कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.





