सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटकुल जवळील उजनी धरणाचा कालवा फुटला आहे. अचानक कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर शेतीत घुसले आहे. यामुळे शेकडो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 25 जानेवारीपासून शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे सध्या कालवा हा पूर्ण क्षमतेने वाहत होता. शेतीत पाणी घुसल्याने द्राक्ष, केळी, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले आहे.





