युवा पत्रकार रुपेश रटाटे यांच्या एल्गारला पोलीस प्रशासनाची मिळणार साथ.? ; धाटावच्या अवैद्य गावठी दारू विक्री हद्दपार करण्याचे पोलिसांचे आश्वासन.

201

रायगड – रोहा

दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ अर्थात कल रोजी रोहा तालुक्यातील धाटाव गाव अंतर्गत चालू असलेल्या रसायनयुक्त गावठी दारू विक्रेते यांच्या विरोधात रायगड जिल्हा डिजिटल मीडिया प्रसिध्दी प्रमुख युवा पत्रकार रुपेश रटाटे यांनी दिलेल्या निवेदनाच नेमकं काय झालं..? कोणती कारवाई केली..? याची संबधित शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.

दारूबंदीसाठी केलेल्या युवा पत्रकार रूपेश रटाटे यांच्या दमदार एल्गाराला रोहा तालुक्यातील विविध संघटनेतील पत्रकारांनी पाठिंबा दर्शवत गेली २० ते २५ वर्ष धाटाव गावाला लागली गावठी धंद्याची कीड कायमस्वरुपी बंद करण्याचा चंग बांधला आहे. ‘रोहाची दारू मस्त, संसार मात्र होतात उध्वस्त’ अशी गावठी दारूची ओळखबनली असेल तरी देखील आत्तापर्यंत अनेक संसार उद्ध्वस्त होऊन, त्यांचे कुटुंब रस्त्यावर आल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या अधीन जाऊन त्यांचा कल आत्ता गुन्हेगारीकडे वळत आहे.

 

रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील गावठी दारूमधून झालेल्या विषबाधेतून अनेकांचे जीव गले आहेत. याची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहायची आहे का…?, असा जोरदार देखील सवाल यावेळी मांडण्यात आला. तर शेजारी असलेल्या पाली तालुक्यामधील 2008 मध्ये झालेल्या स्पिरीट कांडात 26 जणांचा बळी गेला होता. या दारूकांडाचा अभ्यास केला तर यात बाधित होणारा समाज हा बहुतांशी आदिवासी समाज होता. व्यसनाधीनता आणि गरिबी यामुळे गावठी, हातभट्टीसारख्या दारूच्या आहारी हा समाज गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता अशा अवैधरीत्या उत्पादित होणार्‍या दारू विरोधात व्यापक कारवाई होणे गरजेचे आहे.
आत्तापर्यंत किती वेळा या अवैद्य गावठी विक्रेत्या विरोधात ग्रामस्थ आणि पोलिसांनी कार्यवाही केली याची सर्व कागदपत्रे आत्ता हाती लागली आहेत. त्यामुळे एवढ्या वेळा कारवाई करून देखील हे विक्रेते पोलीस प्रशासनाला जुमानत नाहीत, असे अधोरेखित झाले आहे. पोलीस प्रशासनाने देखील पत्रकार संघटनेच्या या निवेदनाला गांभीर्याने घेत, अवैद्य गावठी विक्रेत्यांविरोधात हद्दपार करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले असून येणाऱ्या काळात या उन्मत्त झालेल्या आणि कोणत्याही शासकीय यंत्रणेला न जुमानणाऱ्या विक्रेत्यांना चाप बसणार असे आशादायी चित्र दिसून येत आहे. तरी देखील तालुक्यातील विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आणखी एक निवेदन तसेच आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईचे सर्व अहवाल रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सादर करण्याचे स्पष्ट संकेत देखील वर्तविले आहे. त्यामुळे या विक्रेत्यांना हद्दपारशिवाय पर्याय राहिला नाही, असे दिसतआहे.