पदवीधरांच्या नोंदणीसाठी आयोजित केलेल्या उद्याच्या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा – सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आवाहन. ; सावंतवाडीत उद्या पदवीधरांच्या नोंदणीसाठी विशेष शिबीर.

432

सावंतवाडी : भारत निवडणूक आयोग यांनी पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम घोषित करणेत आलेला असून त्यानुसार दिनांक 30/09/2023 रोजीपासून पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु झालेला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदवीधर यांची नोंदणी करणेकामी उद्या दिनांक 28/10/2023 रोजी दुपारी 12 : 00 ते सायंकाळी 5 :00 या कालावधीत तहसीलदार कार्यालय सावंतवाडी यांचे सभागृहात कॅम्प आयोजित करणेत आलेले आहे. तरी सर्व पदवीधर यांनी मतदार नोंदणी करावी, असे आव्हान अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी, कोकण विभाग पदवीधर मतदार संघ तथा तहसीलदार सावंतवाडी यांनी केले आहे.

पदवीधर नोदणीकरिता नमुना नंबर 18 सोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

1) मार्कशिट किंवा convocation प्रमाणपत्र ( दि.1/11/2020 पूर्वी ज्यांचे Graduation / पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती या मतदार म्हणून नाव नोंदवू शकता )

2) रहिवास पुरावा ( रेशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा आधारकार्ड किंवा गॅस नोंदणी कार्ड)

3) एक पासपोर्ट साइज कलर फोटो

4) नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड

5) सर्व झेरॉक्स स्वयं साक्षाकित व राजपत्रीत अधिकारी यांनी प्रमाणित

6) ज्याचेकडे रहिवास पुरावा नाही त्यांनी सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानाची प्रत व कार्यालय, प्रमुखाचा दाखला सादर करावा.

तरी जास्तीत जास्त पदवीधर व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.