विज्ञान व तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घेऊन जगाचे नेतृत्व करा.! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर. ; सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन, राज्यभरातील आठ विभागीय संघांची उपस्थिती.

143

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणली. भविष्यात तंत्रज्ञानयुक्त युवा पिढीची जगाला गरज आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी जगाचे नेतृत्व करणार आहे. तुम्हा मुलांमध्ये ती ताकद नक्कीच आहे. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करणं हे आपलं कर्तव्य असून मुलांनी विज्ञान व तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घ्या व जगाचे नेतृत्व करा, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
दरम्यान, विज्ञान हा आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. मात्र, महाराष्ट्रातील मुलं ही नेहमी विज्ञान गणित व भाषा या विषयांमध्ये कमी पडताना दिसतात. त्यामुळे या विषयांमध्ये मुलांची प्रगती व्हावी यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केसरकर यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई राज्य विज्ञान शिक्षण संस्था
प्रादेशिक विद्या प्रशिक्षण, रविनगर, नागपूर
विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी केसरकर बोलत होते.

आपला देश जगात बलशाली देश आहे. त्यामुळे जगात कोणाचीही आपल्याकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत नाही. उलट जगालाच आपल्याकडील युवा पिढीची गरज आहे. जर्मनी सारख्या देशात आज चार लाख युवकांची गरज आहे. त्यामुळे पुढील काळात येथील मुलांना जर्मन भाषा शिकविली जाईल. आमचे त्यासाठी प्रयत्न आहेत मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांनीही त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
राज्यातील शालेय शिक्षण योग्य प्रतीचे व दर्जाचे व्हावे यासाठी अलीकडेच मी ‘एक्सपर्ट कमिटी ‘ नेमली आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगल्या आरोग्याची ही गरज आहे. यासाठीच शाळांमधून दिलं जाणारं ‘मिड डे मिल’ अर्थात ‘मध्यान्न भोजन ‘ हे चविष्ट असण्याबरोबरच ते पौष्टिक व चांगल्या दर्जाचे असण्यासाठीही आमचे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.पूर्वीच्या शिक्षणात व आताच्या शिक्षणात आमुलाग्र बदल झाला आहे. आता व्यवसायिक शिक्षणाकडे जास्त कल आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाची गरज आहे. कुटुंब सांभाळण्यासाठी नोकरी वा व्यवसायाची गरज असते. त्यामुळे आपल्या जीवनाकडे बघताना कोणतेही काम कमी न मानता आपल्या व आपल्या कुटुंबाच्या प्रगती बरोबरच देशाचीही प्रगती साधण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया, असे आवाहनही केसरकर यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक कमलादेवी आवटे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरच्या संचालक डॉ. राधा अतकरी, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य सुशील शिवलकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, विज्ञान विभाग पुणेच्या विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणेचे अधिकारी प्रभाकर क्षीरसागर, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे अधिव्याख्याता प्रवीण राठोड, विज्ञान पर्यवेक्षक राजू नेब, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके,सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अशोक दळवी,आबा केसरकर, नंदू गावडे, नंदू शिरोडकर, श्री. कोरगांवकर, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मानकर आदी उपस्थित होते.

 
या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवात राज्यभरातील आठ विभागीय संघाने सहभाग घेतला होता. यात मुंबई विभागाने ‘बरसो से छुपा हुआ अनदेखा ‘, पूणे विभागाने ‘वापरु नवीन तंत्रज्ञान करू भारत महान ‘, कोल्हापूर विभागाने ‘ भरडधान्ये काळाची गरज ‘, नाशिक विभागाने ‘ मिलेटस श्रेष्ठ आहार, नागपूर विभागाने ‘ अन्न पूर्णब्रम्ह ‘ अमरावती विभागाने ‘ खादाड ‘ तर औरंगाबाद विभागाने ‘फूड सिक्युरीटी ‘ व लातूर विभागाने ‘अंधश्रद्धा निर्मूलन ‘ या नाटिकांचे सादरीकरण केले. परीक्षक म्हणून शंकर घोरपडे ( पुणे ), दीपक आमोणकर ( गोवा ) व डॉ. प्रमोद कसबे ( कोल्हापूर ) यांनी काम पाहिले.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगांवकर, उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, हनुमंत वाळके उपाध्यक्ष, श्री.नारकर सर, श्री. पेडणेकर सर, श्री. अभिजीत जाधव सर, श्री. मारुती फाले, श्री. एन. पी. मानकर सर, सौ. माधवी सावंत, सौ. धुरी मॅडम, श्री. राजम सर, श्री. कांबळे सर, श्री. तुषार सकपाळ, श्री. सत्यपाल लाडगांवकर, श्री.सुशांत पाटील, श्री.सिद्धार्थ तांबे, श्री.अविनाश मांजरेकर,  सौ. शैलजा वेटे, अविनाश कांबळे
प्रशांत धोंड, राजेंद्र राठोड, पी. जे. कांबळे,  श्री. नंदकिशोर म्हापसेकर, श्री.भोसले सर, माजी जिल्हा अध्यक्ष श्री. एम. जी. मातोंडकर,  माजी मुख्याध्यापक श्री. संजीव राऊत,  सौ. सुविद्या विकास केरकर नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, प्रा. अमोल कांबळे, प्रा. भिसे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी केले. तर आभार सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी मानले. आपल्या नेहमीच्याच खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमेधा नाईक यांनी केले. यावेळी राज्यभरातील विज्ञान शिक्षक, जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाभरातील विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.