सावंतवाडी: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गोवा मोपा विमानतळावर राष्ट्रवादी कॉंग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे-परब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार सौ. सुळे आज जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.





