रोहा : शशिकांत मोरे
प्रत्येक एमआयडीसीतील इन्फ्रास्ट्रक्चर चांगले असले पाहिजेत.जेणेकरून बाहेरील देशातील गुंतवणूकदार हे आपल्याकडे कारखाने प्रस्थापित करतील, उत्पदीत मालाचा उठाव करतील.त्यामुळे रोजगार निर्मितीस मदत होईल. शासनाचा जीआर असा आहे, की स्थानिकाना रोजगार उपलब्ध करून देणे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर कामगारांची सुरक्षा महत्वाची असल्याने रोह्यामध्ये एमआयडीसीतील आरक्षित भूखंडावर कामागार रुग्णालय तयार करून देण्याला मंजुरी मी देत आहे असे विधान नामदार उदय सामंत यांनी केले. तळोजा, रोहा, महाड व पेणमध्ये कामगार रुग्णालंय व्हावे यासाठी मंजूरी मी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रोहा औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र. आर 2/1 एम. बी. मोरे फाउंडेशन शेजारी, रोहा औद्योगिक येथे नवीन विश्रामगृह बांधकामाच्या भूमिपूजन समारंभ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडल. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, मंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर, धाटाव सरपंच सुवर्णा रटाटे, भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग,प्रांतधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे रोठ सरपंच नितीन वारंगे व ग्रामस्थ व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना ना. उदय सामंत म्हणाले कि, खा. सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या विभागात अनेक विकासकामे झालेली आहेत.रस्त्याच्या कडेच्या स्ट्रीट लाईट सुद्धा मी मंजूर करीत आहे. पनवेल, रोहा, पाली व सावार्डा येथे एमआयडीसीचे विश्रामगृह तयार करण्यात येणार आहेत. त्याच्याबरोबर आज धावीर महाराजांना पोलीस वंदना देण्यात आली. ही पोलिसांची सलामी भव्यदिव्य झाली पाहिजे यासाठी राज्यशासनाने परिपत्रक काढून
महाराष्ट्रातील सर्वात चांगली सलामी ही धावीर महाराजांना दिली पाहिजे ही दक्षता घ्यावी लागेल असे मत व्यक्त केले. एमआय डीसी चा विस्तार होत आहे त्यामुळे अपघातात वाढ होते त्यामुळे फायब्रिगेडाची गाडी मी आज मंजूर करीत आहे. राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी ज्या भावनेने रोह्याच्या विकासाकरिता कामांची मागणी केली ती सर्व कामे मी मंजूर करीत आहेत. आज ज्या इमारतीचे उदघाटन झाले ते रोह्यात साडेआठ कोटी खर्च करून हा विश्राम गृह बांधन्यात येणार आहे असेही ते म्हणाले.

“एमआयडीसीच्या माध्यमातून स्वतंत्र विश्रामगृह व सोईसुविधा उपलब्ध होणार आहे. इएसआयसी मार्फत रोहा एमआयडीसीमध्ये शंभर खाटांचे स्वतंत्र हॉस्पिटल असावे, यासाठी आपण प्रस्ताव दिला आहे. तो पालकमंत्री सामंत यांनी मंजूर करावा.ही आरोग्य सुविधा खुप महत्वाची आहे.तसेच रोहा ते निवि हा रस्ता अर्धवट झाला आहे त्यापुढील रस्त्याचे काम उद्योग विभागाच्या दृष्टीने लक्ष देऊन मंजुरी द्यावी अशी मागणी केली.!”
नाम. अदिती तटकरे
राज्यमंत्री, महाराष्ट्र.





