BIG NEWS – इंडियन नेव्हीच्या ८ जवानांना फाशीची शिक्षा! ; ‘या’ देशानं उचललं मोठं पाऊल.

59

दोहा : कतारमध्ये 8 माजी भारतीय नौसिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हेरगिरी प्रकरणात दोषी ठरल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली असून आम्ही याप्रकरणी सातत्यानं कतारच्या संपर्कात आहोत, असं म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्रालय आश्चर्यचकीत –

या निर्णयाविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रक जाहीर करत याची माहिती दिली आहे. यात मंत्रालयानं म्हटलं, फाशीच्या निर्णयाच्या शिक्षेने आम्ही आश्चर्यचकीत झालो आहोत. पण कोर्टाच्या विस्तृत निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत. ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली त्यांनी आम्ही त्या कुटुंबातील सदस्यांच्या आणि कायदेतज्ञांच्या टीमच्या संपर्कात आहोत.

कतारसमोर उपस्थित करणार प्रश्न – 

कायदेशीरबाबींची आम्ही चाचपणी करत आहोत. या निर्णयाकडं सरकारच बारकाईनं लक्ष आहे. या निर्णयाचा मुद्दा कतारच्या अधिकाऱ्यांसमोर देखील उपस्थित करणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.